अंबरीश ऋषी महाराज टेकडी परिसरात क्लोरीन वायू गळतीची घटना; प्रशासनाची तातडीने उपाययोजना.

0

आबिद शेख/अमळनेर


शहरातील अंबरीश ऋषी महाराज टेकडी परिसरात क्लोरीन वायू हाताळणीदरम्यान तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने वायू गळतीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार मोठ्या प्रमाणात क्लोरीन वायू बाहेर पडल्याने परिसरात काही काळ सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्यात आल्या तसेच नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.


क्लोरीन वायूचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे श्वसनास त्रास, डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे किंवा अस्वस्थता जाणवल्यास नागरिकांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कारवाईदरम्यान अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्या नेतृत्वाखाली फायरमन दिनेश बिऱ्हाडे, वाहनचालक फारुख शेख तसेच जफर पठाण, रफिक पठाण, आकाश संदनशीव, आकाश बाविस्कर आणि लखन कंकरे यांनी बचाव व नियंत्रण कार्यात सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed