लायन्स क्लब अमळनेरच्या ५८ व्या पदग्रहण सोहळ्यात नूतन कार्यकारिणीचा पदभार स्वीकार समाजसेवेची गौरवशाली परंपरा नव्या नेतृत्वाखाली अधिक व्यापक करण्याचा निर्धार.

0

आबिद शेख/अमळनेर 


अमळनेर : समाजसेवा, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि विविध लोकहिताच्या उपक्रमांद्वारे गेली ५८ वर्षे शहरात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या लायन्स क्लब अमळनेरच्या सन २०२६–२७ या वर्षासाठीच्या नूतन कार्यकारिणीचा ५८ वा पदग्रहण सोहळा शनिवारी सायंकाळी बन्सीलाल पॅलेस येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ज्येष्ठ लायन नेते तथा पास्ट मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन (पुणे) एमजेएफ लायन द्वारकाप्रसाद जालन यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ देण्यात आली.


यावेळी जितेंद्र पारख यांनी अध्यक्ष, प्रा. जयेश गुजराथी यांनी सचिव तर कुमारपाल कोठारी यांनी खजिनदार म्हणून पदभार स्वीकारला. नव्या कार्यकारिणीने सेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी अधिक प्रभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
शपथविधीनंतर मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे एमजेएफ लायन द्वारकाप्रसाद जालन म्हणाले, “लायन्स क्लब ही केवळ संस्था नसून समाजसेवेची अखंड चळवळ आहे. अमळनेर लायन्स क्लबने गेल्या ५८ वर्षांत सेवाभावी कार्याची समृद्ध परंपरा निर्माण केली असून नव्या नेतृत्वाखाली ही परंपरा अधिक व्यापक स्वरूपात पुढे जाईल.”
मावळते अध्यक्ष डॉ. संदीप जोशी यांनी वर्षभरातील सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमांचा आढावा सादर केला. तसेच नितीन विंचूरकर यांनी विविध सेवा प्रकल्पांचा सविस्तर अहवाल मांडला.
झोन चेअरपर्सन लायन जितेंद्र जैन यांनीही मार्गदर्शन करताना लायन्स क्लबच्या सातत्यपूर्ण सेवाभावी कार्याचे कौतुक केले आणि नव्या कार्यकारिणीला आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात प्रदीप जैन आणि डॉ. मिलिंद नवसारीकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. मावळत्या पदाधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना बॅज परिधान करून पदभार सुपूर्द केला.
अध्यक्षीय मनोगतात जितेंद्र पारख म्हणाले, “सेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लबचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यास प्राधान्य दिले जाईल.”
या सोहळ्यास लायन्स क्लबचे सदस्य, लायन परिवार, रोटरी क्लबचे सदस्य तसेच शहरातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करत आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नयना नवसारीकर, रुपाली सिंघवी आणि जया जैन यांनी केले, तर प्रा. जयेश गुजराथी यांनी आभार मानले.
नव्या नेतृत्वाखाली लायन्स क्लबच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण आणि मानवतावादी सेवा उपक्रमांना अधिक गती मिळेल आणि संस्थेची गौरवशाली सेवापरंपरा अधिक जोमाने पुढे नेली जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed