राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त डी. आर. कन्या शाळेत विविध उपक्रम; पत्रकार चेतन राजपूत व रविंद्र मोरे यांचा सत्कार.

0

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : खा. शि. मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत रयतेचे राजे, सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते व आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष तथा दैनिक जनवास्तवचे संपादक चेतन राजपूत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘महादर्पण’चे संपादक रविंद्र मोरे उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती आठवले, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, पी. पी. जोशी, ज्येष्ठ शिक्षक एस. एस. माळी, के. आर. बाविस्कर, आर. एस. सोनवणे, ज्येष्ठ लिपिक शाम पवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी नवनियुक्त शहराध्यक्ष चेतन राजपूत तसेच पुरस्कार प्राप्त पत्रकार रविंद्र मोरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व राजर्षी शाहू महाराजांचे पुस्तक देऊन मुख्याध्यापिका सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापिका सूर्यवंशी यांनी राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक, शैक्षणिक आणि लोककल्याणकारी कार्य विद्यार्थिनींसमोर उलगडले. त्यांनी समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. युवा कल्याण प्रतिष्ठानच्या कु. स्नेहल शिसोदे यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले.
जयंतीनिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळ व दुपार सत्रातील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थिनींना राजर्षी शाहू महाराजांवरील पुस्तके देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात चेतन राजपूत यांनी शाहू महाराजांनी शिक्षण, सामाजिक न्याय, आरक्षण, व्यायामशाळा आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून समाजपरिवर्तनासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. एस. देवरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. पी. एस. सराफ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय समितीचे अध्यक्ष जितेंद्र जैन, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed