अमळनेरमध्ये कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात मुस्लिम समाजाचे निवेदन; कायदेशीर कारवाईची मागणी.

0

आबिद शेख/अमळनेर 


सोशल मीडियावर इस्लाम धर्म, पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.) तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत नाजिया ईलाही नावाच्या महिलेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अमळनेर शहर मुस्लिम समाज आणि AIMIMच्या वतीने करण्यात आली. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, संबंधित महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका मुलाखतीदरम्यान इस्लाम धर्म आणि पैगंबर मोहम्मद (स.अ.व.) यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केले असून त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी AIMIM अमळनेर शहराध्यक्ष सईद शेख, अल्तमश शेख, हाजी दबीर पठाण, गुलामनबी पठाण, इमरान शेख, दानिश शेख, रिझवान मनियार, हाफिज तौसीफ रझा, हाफिज मुस्तफा रझा, मोहतशिम मुबल्लिग, नईम एफ. पठाण, असलम काझी सर, इब्राहिम सर, मुश्ताक सर,जमाल शेख, इमरान भाया यांच्यासह मुस्लिम समाजातील अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
सदर निवेदनाची दखल घेऊन प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत राहून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed