अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीनमुळे अमळनेरच्या स्वच्छता व्यवस्थेला मिळणार नवे बळ.

0

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर : शहरातील स्वच्छता व्यवस्थेचे आधुनिकीकरण, सांडपाणी व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करणे तसेच नागरिकांना अधिक दर्जेदार व परिणामकारक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरिक 2.0) अंतर्गत अमळनेर नगर परिषदेला अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीन वाहन प्राप्त झाले आहे.


या वाहनामुळे शहरातील मुख्य गटारी, नाले, सांडपाणी वाहिन्या आणि जलनिस्सारण यंत्रणेतील गाळ, कचरा व अडथळे अधिक वेगाने आणि प्रभावी पद्धतीने दूर करणे शक्य होणार आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलनिस्सारण व्यवस्था सक्षम ठेवण्यास या यंत्रणेचा मोठा फायदा होणार आहे.
अमळनेर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासासाठी विविध नागरिकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत असून स्वच्छता व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच भाग म्हणून हे वाहन शहराच्या सेवेत दाखल करण्यात आले आहे.
या अत्याधुनिक वाहनामुळे सार्वजनिक आरोग्य संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छता मोहिमेला अधिक गती मिळणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. भविष्यात स्वच्छ, सुंदर व विकसित अमळनेर घडविण्याच्या उद्दिष्टाला या उपक्रमामुळे बळ मिळणार आहे.
या उपक्रमाबद्दल नगर परिषद प्रशासन, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed