अमळनेर ग्रामिण रुग्णालयात 20 अतिरिक्त पदाना मंजुरी-आ.अनिल पाटील उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने वाढणार 4 डॉक्टर व स्टाफ,आरोग्य सेवा होणार वृद्धिंगत.

0

आबिद शेख/अमळनेर 

अमळनेर:-येथील ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हारुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन झाले असल्याने 20 अतिरिक्त पदाना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिली असून यामुळे 4 तज्ञ डॉक्टर व इतर स्टाफ वाढून येथील आरोग्य सेवा अधिक वृद्धिंगत होणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
याबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन आदेश दिनांक 24 जून 2026 रोजी प्रसिद्ध झाला असून यात राज्यातील काही रुग्णालयांचा समावेश आहे.राज्यातील 50 टक्के पेक्षा जास्त बांधकाम झालेल्या नवनिर्मित अथवा श्रेणी वर्धीत आरोग्य संस्था करिता पदनिर्मिती करण्यात आली असून अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे उप जिल्हारुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन झाल्यानंतर याचे बांधकाम देखील 90 टक्के पूर्ण झाले असल्याने या पद वाढीस मंजुरी मिळाली आहे.विशेष म्हणजे आमदार अनिल पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तब्बल 24 वर्षांनंतर ही पद वाढ झाली आहे.

चार अतिरिक्त डॉक्टरांमुळे रुग्णांना मिळणार लाभ

अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आधी एकूण 29 पदे होती त्यात एक वर्ग 1 चे वैद्यकीय अधीक्षक 1,वर्ग 2 चे 3 वैद्यकीय अधिकारी आणि इतर स्टाफ चा समावेश होता.आता 20 पदे वाढली असून त्यात 4 डॉक्टर असतील यात 1 सर्जन, 1 फिजिशियन आणि 2 एमबीबीएस डॉक्टर्सचा समावेश असेल याशिवाय इतर नर्सिंग व अन्य कर्मचारी असतील.सदर रुग्णालयात एनएचएम अंतर्गत कंत्राटी 20 आहेत आधीची आहेत.म्हणजेच आरोग्य सेवेची मोठी टीम अमळनेर रुग्णालयात कार्यरत असणार आहेत.
दरम्यान अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे उप जिल्हारुग्णालयात रूपांतर करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी पाठपुरावा केल्याने त्यास यश आले त्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम देखील सुरू होऊन तेही पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे.व आता आमदारांच्याच प्रयत्नांनी पदे देखील वाढल्याने अमळनेर परिसरातील रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.याकामी पाठपुरावा करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रकाश ताळे व इतर स्टाफ चे सहकार्य लाभल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. सदर मंजुरी बद्दल आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार,आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed