पाणीप्रश्नी उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांची थेट पाहणी; टाकीत उतरून घेतली वस्तुस्थितीची माहिती.

0

अमळनेर | आबिद शेख 


अमळनेर शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये व्यक्त होत असलेल्या नाराजी आणि दूषित पाण्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष तथा शिव पेट्रोल पंप संचालक प्रशांत निकम यांनी प्रत्यक्ष पाण्याच्या टाकीची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली.
आज त्यांनी कोर्ट परिसरामागील पाण्याच्या टाकीत उतरून पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत आणि नागरिकांना दूषित पाणी मिळत असल्याच्या तक्रारींची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला. या पाहणीदरम्यान संबंधित यंत्रणा आणि प्रशासनाने पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले.
यावेळी प्रशांत निकम यांनी केवळ कार्यालयीन स्तरावर चर्चा करून प्रश्न सुटत नाहीत, तर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वस्तुस्थिती जाणून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. शहरातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले जातील, असेही त्यांनी नमूद केले.


नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर प्रत्यक्ष काम करण्याची भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या या कृतीची शहरात चर्चा होत असून अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. जनप्रतिनिधींनी लोकांच्या मूलभूत गरजांकडे प्राधान्याने लक्ष देत प्रत्यक्ष सहभागातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षाही यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed