मलिक मुस्तुफा मलिक अजीज यांची युवासेना अल्पसंख्यांक रावेर तालुका प्रमुखपदी नियुक्ती.

0

24 प्राईम न्यूज 21 Jun 2026


रावेर : शिवसेना पक्ष संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने मलिक मुस्तुफा मलिक अजीज (रा. वाघोदा, ता. रावेर) यांची युवासेना अल्पसंख्यांक रावेर तालुका प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या प्रेरणेने, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार, आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या आदेशाने तसेच युवा सेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या मान्यतेने करण्यात आली आहे. जिल्हा प्रमुख पंकज राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी सोपविण्यात आली.
नियुक्तीनंतर मलिक मुस्तुफा मलिक अजीज यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत पक्षवाढ, संघटन मजबूत करणे आणि सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच शिवसेनेचे विचार आणि कार्य सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रियपणे काम करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed