फाफोरे बु.-बिलखेडा परिसरात रेती वाहतुकीवर कारवाई; रेतीने भरलेले ट्रॅक्टर मालासह तहसील कार्यालयात जप्त.
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : मौजे फाफोरे बु.-बिलखेडा परिसरात अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाने कारवाई करत रेतीने भरलेले ट्रॅक्टर मुद्देमालासह पकडून तहसील कार्यालय, अमळनेर येथे जमा करण्यात आले.
महसूल विभागाच्या पथकाने परिसरात तपासणी मोहीम राबवत ही कारवाई केली. कारवाईदरम्यान रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या कारवाईत तलाठी अभिमान जाधव (कन्हेरे), मंडळ अधिकारी योगेश पाटील, मंडळ अधिकारी हेडावे, तलाठी गुलाबसिंग पावरा (जुनोने) तसेच कोतवाल भटू पाटील (मंगरूळ) यांनी सहभाग घेतला.
महसूल प्रशासनाकडून अवैध रेती वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येत असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
