स्वप्नील पाटील यांची पतसंस्था चेअरमनपदी निवड ; शिक्षक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.
अमळनेर /आबिद शेख

अमळनेर येथील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे उपशिक्षक स्वप्नील वसंतराव पाटील यांची जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाली आहे.
जळगाव येथील पतसंस्थेच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुरुवारी ही निवड करण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राकेश पाटील, प्रसन्ना बोरोले, आशिष पवार, अविनाश घुगे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पाटील यांचे साने गुरुजी विद्या मंदिर शाळेत आणि शहरातील भगवा चौकात जोरदार स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.
त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षक वर्तुळातून तसेच विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
