५ जून पर्यावरण दिनानिमित्त अमळनेर रेल्वे स्टेशन परिसरात वृक्षारोपण* रोटरी क्लब अमळनेर, महिला हाऊसिंग ट्रस्ट व रेल्वे प्रशासनाचा संयुक्त उपक्रम.

0

आबिद शेख/ अमळनेर 

अमळनेर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोटरी क्लब अमळनेर, महिला हाऊसिंग ट्रस्ट व अमळनेर रेल्वे स्टेशन प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर रेल्वे स्टेशन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लबचे सचिव रो. आशिष चौधरी यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगून अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याबरोबरच त्यांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.


या उपक्रमांतर्गत रेल्वे स्टेशनच्या परिसरातील गार्डनमध्ये विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणासाठी रेल्वे प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून खड्डे खोदणे, संरक्षक फेन्सिंग उभारणे व जागेची योग्य व्यवस्था करणे अशी महत्त्वपूर्ण कामे केली होती.


यावेळी स्टेशन प्रबंधक अनिल बी. शिंदे, परिवहन निरीक्षक लालबाबू सिंग, वाणिज्य निरीक्षक रवी पांडे, IPF(RPF) निरीक्षक श्री. सत्यजित कुमार, स्वास्थ्य निरीक्षक सोनी सिंग, कार्यनिरीक्षक पंकज हाडेकर, कल्याण निरीक्षक अनिल पी. आर. तसेच रेल्वे प्रशासनातील विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
महिला हाऊसिंग ट्रस्टच्या पर्यावरण सखी यांनी देखील मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण करून प्रत्येक रोपाला आधार देणे, बांधणी करणे व पाणी देण्याची जबाबदारी पार पाडली. गेल्या वर्षी पर्यावरण सखींच्या माध्यमातून संपूर्ण अमळनेर शहरात सुमारे १२ हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे यशस्वी संगोपन करण्यात आले होते. या पर्यावरणप्रेमी महिलांनी झाडांची जपणूक करत त्यांना जगविण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे.
यावर्षीही १२ ते १५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, अमळनेर शहरातील विविध भागांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अमळनेर रेल्वे स्टेशन येथून करण्यात आल्याचे रो. आशिष चौधरी यांनी सांगितले.
या प्रसंगी रोटरी क्लब अमळनेरचे अध्यक्ष रो. देवेंद्र कोठारी, सचिव रो. आशिष चौधरी, प्रकल्प प्रमुख रो. प्रीतपाल सिंग बग्गा, रो. विजय माहेश्वरी, रो. विजय पाटील, रो. अभिजीत भंडारकर, रो. महेश पाटील, रो. चेलाराम सैनानी, रो. ईश्वर सैनानी आदी सदस्य उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षण व हरित अमळनेरच्या दिशेने राबविण्यात आलेला हा संयुक्त उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून, भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
“एक वृक्ष – एक संकल्प, हरित भविष्य आपला संकल्प”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed