अमळनेरात आज शिवसेनेचा ‘शिवसंवाद दौरा’; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करणार शिवसैनिकांशी संवाद.

अमळनेर : शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यभर विधानसभा निहाय “शिवसंवाद दौरा” आयोजित करण्यात येत असून, शिवसेना संसदीय गटनेते Dr. Shrikant Shinde यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्याचा दौरा शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

अमळनेर येथील हॉटेल मिडटाऊन येथे दुपारी २.३० वाजता अमळनेर, जळगाव ग्रामीण आणि चोपडा या तीन विधानसभा मतदारसंघांचा संयुक्त शिवसंवाद कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा Gulabrao Patil, शालेय शिक्षण मंत्री Dadaji Bhuse, शिवसेना संपर्कमंत्री धुळे भाऊसाहेब चौधरी, विभागीय सचिव आनंद परांजपे, माजी खासदार दिलीप मामा लांडे यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख व विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या शिवसंवाद दौऱ्यात संबंधित विधानसभा मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून शिवसैनिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, संघटनात्मक कार्यातील अडचणी तसेच आगामी काळातील संघटन बळकटीकरणाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आणि संघटन अधिक सक्षम करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
तरी अमळनेर तालुक्यातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, शाखाप्रमुख, बूथप्रमुख तसेच शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब पाटील यांनी केले आहे
