अमळगाव ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण समिती स्थापन; निलेश महाले पाटील यांची सदस्यपदी निवड.

0
WhatsApp Image 2026-06-05 at 9.20.44 PM

आबिद शेख/अमळनेर 
अमळनेर- प्रतिनिग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने अमळगाव ग्रामीण रुग्णालयासाठी नव्याने सनियंत्रण व व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली आहे. या समितीवर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अमळगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश लक्ष्मण महाले पाटील यांची सामाजिक कार्यकर्ता (पुरुष प्रतिनिधी) म्हणून निवड करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थापन करण्यात आलेली ही समिती रुग्णालयाच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, विविध आरोग्य उपक्रमांना गती देणे तसेच स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवणे या उद्देशाने कार्य करणार आहे.


समितीची रचना
समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदस्य म्हणून पंचायत राज संस्थांचे दोन प्रशासक, एनजीओ प्रतिनिधी संजय कावडे, महिला सामाजिक कार्यकर्त्या सौ. पूनम राहुल पवार तसेच निलेश लक्ष्मण महाले पाटील यांचा समावेश आहे.
पदसिद्ध सदस्य म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक (जळगाव), गट विकास अधिकारी (अमळनेर), उपअभियंता बांधकाम विभाग, पशुसंवर्धन अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ग्रामीण रुग्णालय अमळगावचे वैद्यकीय अधीक्षक हे सदस्य सचिव म्हणून कार्य पाहणार आहेत.
निलेश महाले पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि व्यापक लोकसंपर्काचा लाभ रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, स्वच्छता, औषध उपलब्धता, माता-बाल संगोपन, रोगप्रतिबंधक कार्यक्रम तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निवडीबद्दल आमदार अनिल पाटील, सौ. जयश्री अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, संचालक सचिन बाळू पाटील, शेतकी संघाचे संचालक गणेश भामरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी निलेश महाले पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
निलेश महाले पाटील यांच्या निवडीमुळे अमळगाव ग्रामीण रुग्णालयाच्या सेवांमध्ये अधिक परिणामकारकता येईल तसेच रुग्णांच्या समस्या आणि गरजांना सक्षमपणे वाचा फोडली जाईल, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed