उन्हाच्या कडाक्यात प्रवाशांना दिलासा; दाऊदी बोहरा समाजातर्फे एसटी स्थानकावर शीतपेय वाटप.

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – वाढत्या उष्णतेमुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने अमळनेर येथील दाऊदी बोहरा समाजातील युवा बद्री ग्रुप व मयदी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर एसटी स्थानक परिसरात शीतपेय वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. सकाळपासून दुपारपर्यंत चाललेल्या या उपक्रमाचा लाभ लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत शेकडो प्रवाशांनी घेतला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अमळनेर एसटी आगाराचे व्यवस्थापक प्रमोद बळीराम चौधरी यांचा दाऊदी बोहरा समाजाचे आमिल साहेब मुस्तफा भाई साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच १ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी अमळनेर आगाराचे स्थानक प्रमुख अनिकेत वाल्मीक न्यायदे तसेच वाहतूक निरीक्षक मुकेश ज्ञानेश्वर सैंदाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दाऊदी बोहरा समाजाचे प्रमुख शेख अली हुसेन भाई सैफी, शेख मोहम्मद भाई करमपुरवाला, शेख अब्बास भाई सैफी, मकसूद बोहरी आणि जाकीर क्रोकरीवाला यांनी उपक्रमाला मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बद्री ग्रुपचे मुल्ला हुसेन भाई इझी, मुस्तफा कलकत्तावाला, अली असगर बोहरी, शब्बीर हुसेन मुफद्दल, अकील शब्बीर अकील तसेच मयदी ग्रुपचे होजेफा सैफी, ताहेर इझी, अब्दुलकादर आझाद, हकीमुद्दीन बोहरी, शब्बीर बुकवाला आणि उबे सैफी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
उन्हाच्या कडाक्यात प्रवाशांना थंड शीतपेय उपलब्ध करून देणाऱ्या या सामाजिक उपक्रमाचे प्रवासी वर्गातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, समाजोपयोगी कार्याचा आदर्श दाऊदी बोहरा समाजाने घालून दिल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
