अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ निवडणुकीत 48.85 टक्के मतदान.

0
New Doc 05-30-2026 22.59

आबिद शेख/अमळनेर 
अमळनेर  : अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लि., अमळनेरच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (सन 2025 ते 2030) शनिवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दिवसभर मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने अखेर मतदानाची टक्केवारी 48.85 टक्के इतकी नोंदविण्यात आली.


संघाच्या विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसून आली. उन्हाचा पारा वाढलेला असतानाही शेतकरी, सभासद तसेच महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उपस्थिती लावली. मतदान प्रक्रियेदरम्यान प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
व्यक्तीशः मतदार गटातील 16,332 मतदारांपैकी 7,925 मतदारांनी मतदान केले असून त्याची टक्केवारी 48.52 टक्के राहिली. तर सोसायटी मतदार गटातील 107 पैकी 106 मतदारांनी मतदान केल्याने या गटात तब्बल 99.07 टक्के मतदान नोंदविण्यात आले.


दोन्ही गटांचा एकत्रित विचार करता 16,439 मतदारांपैकी 8,031 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी 48.85 टक्के इतकी झाली.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसून मतदान शांततापूर्ण वातावरणात पार पडल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली. आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून संचालक मंडळावर कोणाची सत्ता येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed