अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान; 16 हजारांहून अधिक मतदार बजावणार हक्क.

0
New Doc 05-30-2026 06.07

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर  – अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लि., अमळनेरच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (सन 2025 ते 2030) आज, शनिवार दि. 30 मे 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली असून मतदानासाठी अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालय परिसरात केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.


या निवडणुकीसाठी तालुक्यातील विविध गावांतील सभासद मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी साने गुरुजी विद्यामंदिर, साने गुरुजी नूतन माध्यमिक हायस्कूल आणि साने गुरुजी कन्या हायस्कूल येथे एकूण 17 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
निवडणूक यंत्रणेच्या माहितीनुसार, केंद्र क्रमांक 1 ते 16 वर एकूण 16,332 मतदार, तर स्वतंत्र मतदार संघासाठी केंद्र क्रमांक 17 वर 107 मतदार नोंदणीकृत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत एकूण 16,439 मतदार मतदानासाठी पात्र आहेत.


अमळनेर, अमळगाव, आर्डी, आनोरे, अटाळे, कळमसरे, खेडी, गलवाडे, चिमणपुरी, चौबारी, तांदळी, धावडे, निंभोरा, पाडळसे, बाम्हणे, मारवड, मालपूर, शिरसाळे, शिरुड, हिंगोणे यांसह तालुक्यातील अनेक गावांतील सभासद या निवडणुकीत सहभागी होणार आहेत.
सहकारी क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असलेल्या अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीकडे तालुक्यातील शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले असून मतदान प्रक्रियेनंतर निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed