देशी गाईला राष्ट्रीय पशु घोषीत करुन गोरक्षणाच्या नावाखाली दहशत पसरविणारयांवर गुन्हे दाखल करा मागणीः ईस्माईल जनसेवा दगू फाऊंडेशनचे निवेदन.

0
New Doc 05-29-2026 10.23

नंदुरबार(प्रतिनिधी)-देशी गाईला राष्ट्रीय पशु घोषित करुन गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करणार्‍यांवर गुन्हे दाखल होऊन दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक राज्याध्यक्ष एजाज बागवान निवेदनाद्वारे केली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्राचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना देण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, आपला भारत देश विविध धर्म संस्कृती व परंपरांचा संगम असलेला भाईचार्‍याचा देश आहे. विशेषत: हिंदू धर्मात गाईला गोमाता म्हणून मान दिला जातो. भारतीय शेती व्यवस्थेत देशी गाईचे योगदान महत्वपूर्ण आहे. शेणखत, गोमूत्र, सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय व ग्रामीण अर्थव्यवस्था यामध्ये तिचा वाटा योगदान आहे. गाईचं संवर्धन केल्यास पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल व ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालक आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. त्यामुळे गाईला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्यात यावे व तिच्या संवर्धनासाठी विशेष कायदे, योजना व संरक्षण धोरणे राबविण्यात यावीत. तसेच देशात सध्या वस्तुस्थिती गौरक्षांनाचे नावाखाली काही तथाकथित संघटना व समाजकंटकांकडून जनावरांची वाहतूक करणार्‍या व्यापार्‍यांची वाहने अडविणे, जनावरे हिसकावून नेणे, वाहनांची तोडफोड व जाळपोळ करणे, व्यापार्‍यांना बेदम मारहाण करणे, मॉबलिंचिग करणे, जीव घेणे हल्ले करणे असे गंभीर घटना वारंवार होत आहेत. अशा घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा येत आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी पारित केलेल्या संविधानाचे विरोधात सर्व काही चित्र दिसत आहे. तरी जे जातीय सलोखा बिघडवत आहे, जातीजातींमध्ये तेढ निर्माण करीत आहे, जे कोणीही असो त्यांचे वर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी व गौरक्षणाचे नावाखाली देशात दहशत निर्माण केली जात आहे. त्या देशी गाईलाच राष्ट्रीय पशु घोषित करण्यात यावे. ही नम्र विनंती. जेणेकरून असे गंभीर स्वरूपाचे घटना देशात घडणार नाहीत. तरी वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जमातेउलमा ए हिंदचे जिल्हाध्यक्ष मौलाना जकरीया, सदा जनसेवा फाऊंडेशनचे राज्य उपाध्यक्ष ऍड.मजहर शेख, कॉंग्रेस रोजगार स्वयंरोजगारचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस दत्तूभाऊ पवार, मन्यार समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष नासीर मन्यार, जावीद शेख, इमरान मन्यार, प्रताप सोनवणे, पांडुरंग गवळी, छोटू पवार, अर्जुन मालवे, ओम पुरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed