ईद-उल-अजहाचा अमळनेरमध्ये उत्साह; सलोखा आणि बंधुभावाचा संदेश.

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : अमळनेर शहरात ईद-उल-अजहा सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. गांधीलीपुरा येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केली व देशात शांतता, ऐक्य आणि प्रगतीसाठी विशेष दुआ करण्यात आली.

शहर ए काझी हाफिजो कारी अझर नुरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण पार पडले. यावेळी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
नमाजनंतर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. तसेच अनेकांनी कब्रिस्तानात जाऊन पूर्वजांच्या स्मृतींना अभिवादन केले.

“नाद विसरून भेदाचा, संदेश देऊ प्रेमाचा…” हा अमळनेरकरांनी दिलेला सलोख्याचा संदेश आजच्या सामाजिक वातावरणात विशेष महत्त्वाचा ठरत आहे.
