साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा लोकसहभागातून रस्ता दुरुस्तीचा संकल्प; ११ जून रोजी श्रमदानाचे आवाहन..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर -“खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” या साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित होत साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण संवर्धन व शेतकरी हितासाठी लोकसहभागातून रस्ता दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्मारकाकडे जाणाऱ्या सुमारे १ किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक व शेतकरी त्रस्त झाले असून, पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी ११ जून साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त श्रमदान आयोजित करण्यात आले आहे.

प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांना श्रमदान, ट्रॅक्टर, जेसीबी तसेच मार्गदर्शन व प्रेरणा स्वरूपात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गलवाडे धार परिसरातील शेतकऱ्यांनाही या खराब रस्त्याचा मोठा फटका बसत असल्याने लोकसहभागातून हा रस्ता तयार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

आजच्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमी प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांची दूरदृष्टी आठवत असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले. प्रताप कॉलेज परिसरातील हिरवाई तसेच मंगळ मंदिर परिसरातील वृक्षराजी ही त्यांच्या पर्यावरणप्रेमाची साक्ष असल्याचे नमूद करण्यात आले.
डॉ. सराफ यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानने तब्बल १३ एकर जागेवर ११ हजार झाडांची लागवड व संवर्धन केले आहे. आता त्या परिसराकडे जाणारा रस्ता सुकर व्हावा, पर्यावरण व शेतकरी यांना आधार मिळावा यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आवश्यक सहकार्य :श्रमदान,ट्रॅक्टर,जेसीबी
११ जून – साने गुरुजी स्मृतिदिन
संपर्क :
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर
मो. नं. : 9075570510
“झाडे लावा – रस्ता बनवा – पर्यावरण वाचवा – शेतकरी वाचवा”
रवि ज्वेलर्स,
सराफ बाजार, अमळनेर,
Mob. 70 74 74 21 21.
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 152600
22 Ct सोने 91.60% : ₹. 142600
18 Ct सोने 75.00% : ₹. 117800
शुद्ध चांदी 999%:₹. 2660/-
भाव प्रती 10 ग्राम
