NEET पेपरफुटी प्रकरणाचा अमळनेर PTA तर्फे तीव्र निषेध

0
New-Doc-05-19-2026-09.18.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : विद्यार्थ्यांच्या भविष्याशी घात करणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अमळनेर PTA तसेच विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांच्या वतीने सोमवार, दि. 18 मे रोजी प्रांत कार्यालय परिसरात शांततामय लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. यावेळी अमळनेरचे प्रांताधिकारी मा. श्री. मयूर भंगाळे यांना निवेदन सादर करण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमळनेर PTA चे अध्यक्ष श्री. भैय्यासाहेब मगर यांनी केले. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व श्री. संदीप घोरपडे यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी व भविष्याशी होणारी तडजोड असह्य असल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
PTA तर्फे सौ. सुरश्री वैद्य तसेच श्री. सुधीर टाकणे यांनी मनोगत व्यक्त केले. NEET अन्यायग्रस्त विद्यार्थीनी लावण्या सातपुते व विद्यार्थी अजिंक्य पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि अन्याय अधोरेखित केला.


यावेळी “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही”, “पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलन शांततामय पद्धतीने पार पडले.
सदर आंदोलनात श्री. किरण माळी, श्री. राकेश बडगुजर, सौ. सुरश्री वैद्य, श्री. ज्ञानेश्वर मराठे, श्री. नागराज माळी, श्री. हर्षल बडगुजर, श्री. स्वर्णदीप राजपूत, श्री. संदीप महाजन, श्री. सुधीर टाकणे, श्री. ज्ञानेश्वर साळुंखे, श्री. अविनाश कोळी, श्री. सुनील पाटील आदी PTA क्लास संचालक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152300

22 Ct सोने 91.60% : ₹. 144300

18 Ct सोने 75.00% : ₹. 119300

शुद्ध चांदी 999%:₹. 2680/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed