महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा बिगुल; १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी १८ जूनला मतदान..

नवी दिल्ली : Election Commission of India अर्थात भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केली आहे. या मतदारसंघांतील सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आवश्यक निकष पूर्ण न झाल्याने निवडणुका रखडल्या होत्या.

मात्र आता सर्व मतदारसंघांमध्ये आवश्यक अटी पूर्ण झाल्याने आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
या निवडणुका सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि औरंगाबाद-जालना या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत होणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात किमान ७५ टक्के स्थानिक संस्था कार्यरत असणे आणि ७५ टक्के मतदार अस्तित्वात असणे आवश्यक असते. यापूर्वी हे निकष पूर्ण न झाल्यामुळे निवडणुका घेण्यात आलेल्या नव्हत्या.
निवडणूक कार्यक्रम असा :
अधिसूचना जाहीर : २५ मे २०२६
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : १ जून २०२६
अर्ज छाननी : २ जून २०२६
उमेदवारी अर्ज माघार : ४ जून २०२६
मतदान : १८ जून २०२६
मतदानाची वेळ : सकाळी ८ ते दुपारी ४
मतमोजणी : २२ जून २०२६
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख : २५ जून २०२६
दरम्यान, संबंधित सर्व मतदारसंघांमध्ये आचारसंहिता तात्काळ लागू करण्यात आली असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 152300
22 Ct सोने 91.60% : ₹. 144300
18 Ct सोने 75.00% : ₹. 119300
शुद्ध चांदी 999%:₹. 2680/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
