संस्काराची सुंदर शिदोरी; अमळनेरमध्ये बाल संस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : गीता परिवाराच्या प्रेरणेने तसेच सौ. उर्मिला जगदीश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेले पाच दिवसीय बाल संस्कार शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

दिनांक ११ मे ते १५ मे २०२६ दरम्यान पार पडलेल्या या शिबिराला पालक व विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लिनेस क्लब ऑफ अमळनेर व गीता परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये मुलांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त, देशभक्ती आणि चांगले संस्कार रुजविण्यावर भर देण्यात आला. आजच्या संगणक, मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात जग जरी जवळ आले असले तरी मुलांमध्ये संस्कारांची उणीव प्रकर्षाने जाणवत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
विभक्त कुटुंब पद्धती तसेच दोन्ही पालक करिअरच्या धावपळीत व्यस्त असल्याने मुलांच्या जडणघडणीसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. अशा परिस्थितीत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा संस्कार शिबिरांची नितांत गरज असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी लिनेस क्लबच्या डॉ. नैना नवसारीकर, कविता पारख, जास्मिन भरूचा तसेच प्रा. जगदीश अग्रवाल, वनश्री अमृतकर, सुनीता करंजे, गंगा अग्रवाल, अर्चना शर्मा, ॲड. भारती अग्रवाल आणि पद्मजा पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल रोटरी क्लब व पीबीए इंग्लिश मीडियमचे चेअरमन डॉ. संदेश गुजराती यांचे आयोजकांनी विशेष आभार मानले.
शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भविष्यातही अशी शिबिरे वारंवार आयोजित करण्यात यावीत, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली असून आयोजकांनीही लोकांच्या आग्रहास्तव पुढील काळात अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 152300
22 Ct सोने 91.60% : ₹. 144300
18 Ct सोने 75.00% : ₹. 119300
शुद्ध चांदी 999%:₹. 2680/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
