नंदुरबार जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधीक्षक अश्विनी सानप मॅडम यांचा सत्कार; शहरातील समस्यांकडे वेधले लक्ष..

आबिद शेख/ अमळनेर
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या आदरणीय अश्विनी सानप मॅडम यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन विविध मान्यवरांनी गुलाबाचे पुष्पगुच्छ देत शुभेच्छा व मुबारकबात दिली.

यावेळी नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष तथा इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक राज्याध्यक्ष एजाज भाई बागवान प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या समवेत निशांत पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री प्रताप दादा सोनवणे, माजी नगरसेवक मोहन भाऊ सराफ, मन्यार समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष नासिर भाई मनियार, काँग्रेस रोजगार स्वयंरोजगाराचे राज्य चिटणीस श्री दत्तू दादा पवार, सिंधी समाजाचे युवा नेते कपिल भाई सिंधी व जितू भाई शहा तसेच राजस्थान समाजाचे ज्येष्ठ नेते भरका भाई उपस्थित होते.

या भेटीदरम्यान नंदुरबार शहरातील विविध मूलभूत समस्या, नागरिकांना भेडसावणारे प्रश्न तसेच कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी नूतन पोलीस अधीक्षक अश्विनी सानप मॅडम यांना सविस्तर माहिती देण्यात आली. नागरिकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
नूतन पोलीस अधीक्षकांनी सर्वांचे आभार मानत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
