जळोद ग्रामस्थांचा दूषित पाणीपुरवठ्याविरोधात एल्गार१८ मेपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यातील जळोद ग्रामपंचायत क्षेत्रात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आता ग्राम

स्थांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
याबाबत समस्त जळोद ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO), जिल्हाधिकारी तसेच संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दूषित पाण्यामुळे गावात उलट्या, जुलाब आणि पोटाचे विकार वाढले असून विशेषतः बालके व वृद्धांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाकडे तोंडी व लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला आहे. पाणीपुरवठ्याच्या स्त्रोताजवळ अस्वच्छता असून सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनाने या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून अमळनेर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनासमोर पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत —
गावात तात्काळ शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा.
पाणी दूषित होण्यामागील कारणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
जलवाहिन्यांची त्वरित दुरुस्ती व साफसफाई करावी.
लेखी आश्वासन व प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही.
तसेच, उपोषणादरम्यान कोणत्याही आंदोलकाच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर श्री. परशुराम अजून कोळी, गौतम सिरसाठ व समस्त जळोद ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 153800
22 Ct सोने 91.60% : ₹. 144300
18 Ct सोने 75.00% : ₹. 120700
शुद्ध चांदी 999%:₹. 2640/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
