अमळनेर पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा धडाका पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली १७ जणांना तडीपार..

आबिद शेख अमळनेर
अमळनेर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमळनेर पोलिसांनी असामाजिक प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १७ जणांना तडीपार केले आहे.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली.
शहरात दहशत निर्माण करणारे, वारंवार गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होणारे तसेच शांततेला बाधा आणणाऱ्या तडीपार आरोपींवर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असून गुन्हेगारांना कोणतीही सूट दिली जाणार नाही.
याबाबत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम म्हणाले की, “अमळनेर शहरात शांतता आणि सुरक्षित वातावरण कायम ठेवण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.”
या धडक कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत केले जात आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 153800
22 Ct सोने 91.60% : ₹. 144300
18 Ct सोने 75.00% : ₹. 120700
शुद्ध चांदी 999%:₹. 2640/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
