आमदार अनिल पाटील यांची ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट.उष्माघात कक्षाची पाहणी; उपजिल्हा रुग्णालयाचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश..

0
New-Doc-05-16-2026-23.29.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : येथील ग्रामीण रुग्णालयाला माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी शुक्रवारी अचानक भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाची संथगती, बंद असलेले स्वच्छतागृह तसेच तुटलेले दरवाजे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


उपजिल्हा रुग्णालयासाठी वरील मजल्यावर सुरू असलेल्या बांधकामाचा वेग अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना धारेवर धरले. कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन महिन्यांत बांधकाम पूर्ण करण्याचे कडक आदेश त्यांनी दिले. तसेच वर्षभरापासून बंद असलेले स्वच्छतागृह तातडीने सुरू करणे, तुटलेल्या दरवाज्यांची दुरुस्ती करणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.


रुग्णालयातील काही बेडशीट अस्वच्छ असल्याचे आढळून आल्याने आमदारांनी याबाबतही नाराजी व्यक्त केली. “रुग्णांच्या आरोग्याशी कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिला. औषधालयासह विविध विभागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांनी पाहणी करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. रुग्णांना स्वच्छ व दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
उष्माघात कक्षाची पाहणी
अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या घटना समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी उष्माघात कक्षाची विशेष पाहणी केली. या कक्षात कुलर, थंड पिण्याचे पाणी, पुरेसा औषधसाठा आणि आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, विजय पाटील, जयेश पाटील उपस्थित होते. तसेच रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे, डॉ. जी. एम. पाटील, डॉ. संदीप जोशी, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. सुमित पाटील, डॉ. परेश पाटील, बांधकाम अभियंता भागवत माळी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 153800

22 Ct सोने 91.60% : ₹. 144300

18 Ct सोने 75.00% : ₹. 120700

शुद्ध चांदी 999%:₹. 2640/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed