शहराबाहेरील हॉटेल चिन्मय मागील शेतात भीषण आग; गहू, मका जळून खाक..

0
New-Doc-05-16-2026-09.39.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहराबाहेरील धार–मारवड रस्त्यावरील चिन्मय हॉटेलच्या मागील शेतात गुरुवारी (१५ मे) दुपारी भीषण आग लागल्याने शेतातील काढून ठेवलेला गहू, मका व चारा जळून खाक झाला.

दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
आगीच्या झळा वाढत गेल्याने जवळील चिन्मय हॉटेललाही आग लागली होती. तसेच परिसरातील मोठ्या झाडांनीही पेट घेतला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने हॉटेलची आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली. मात्र जोरदार वाऱ्यामुळे शेतातील गहू व चाऱ्याला लागलेली आग वेगाने पसरत होती. कडक उन्हामुळे गवत व चारा क्षणार्धात जळत असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती.


घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक किरण बागुल, जालिंदर चौधरी व श्याम बागुल यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्याशी संपर्क साधून अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांनी तातडीने तीन अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना केले.
दिनेश बिराडे, फारूक शेख, मच्छीन्द्र चौधरी, आकाश संदानशिव व जफर पठाण यांनी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अग्निशमन गाड्यांमधील पाणी संपल्यानंतर पुन्हा पाणी भरून आणण्यात आले. आग घरांकडे पसरू नये म्हणून रामवाडी बाजूकडूनही पाण्याचा मारा करण्यात आला. स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 155000

22 Ct सोने 91.60% : ₹. 144600

18 Ct सोने 75.00% : ₹. 121000

शुद्ध चांदी 999%:₹. 2680/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed