संसाराचा गाडा दोघांच्या कष्टावरच चालतो; घरकाम करणाऱ्या महिलांच्या श्रमांची दखल घेण्याची गरज. दर्शना पवार.

0
New-Doc-05-15-2026-13.02.jpg


आबिद शेख/अमळनेर
घर चालवण्यासाठी फक्त पैसा कमावणे पुरेसे नसते, तर घरातील प्रत्येक गोष्ट सांभाळणाऱ्या महिलांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असते. पुरुष बाहेर जाऊन अर्थार्जन करतो, तर महिला घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून कुटुंबाचा आर्थिक भार हलका करत असते. मात्र तिच्या या श्रमांची किंमत अनेकदा दुर्लक्षित राहते, अशी भावना सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार यांनी व्यक्त केली आहे.


महिलांच्या दैनंदिन कामांमध्ये स्वयंपाक, कपडे धुणे, भांडी घासणे, घर झाडणे-पुसणे, लहान मुलांची व ज्येष्ठांची सेवा, पाहुणचार, सण-उत्सवाची तयारी, वर्षभरासाठी लोणचे-पापड तयार करणे अशा असंख्य जबाबदाऱ्यांचा समावेश असतो. ही सर्व कामे ती कोणत्याही मोबदल्याशिवाय करत असल्याने प्रत्यक्षात मोठी आर्थिक बचत कुटुंबासाठी होत असते.
“पुरुष २० हजार रुपये कमावतो आणि महिला आपल्या कामातून २० हजारांची बचत करून देते. अशा दोघांच्या एकत्रित योगदानातून संसाराचा गाडा चालतो. मात्र अनेकदा पुरुषांना आपणच घर चालवत असल्याची भावना निर्माण होते आणि महिलांच्या श्रमांकडे दुर्लक्ष केले जाते,” असे दर्शना पवार यांनी म्हटले आहे.


त्यांनी पुढे सांगितले की, घर चालवणे ही नोकरी नसून २४ तासांची जबाबदारी आहे. महिलांना ना पगार, ना सुट्टी, ना बढती आणि ना निवृत्ती मिळते; तरीही त्या आयुष्यभर कुटुंबासाठी समर्पितपणे काम करत असतात. शासनाच्या आर्थिक गणनेतही या श्रमांचा विचार होत नसल्याने महिलांच्या योगदानाची योग्य दखल घेतली जात नाही.
घरातील महिलांच्या श्रमांचा सन्मान करणे आणि त्यांच्या कामाला सामाजिक मान्यता मिळणे ही काळाची गरज असल्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 158000

22 Ct सोने 91.60% : ₹. 147500

18 Ct सोने 75.00% : ₹. 123500

शुद्ध चांदी 999%:₹. 2800/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed