अमळनेरात सात दिवसीय विनामूल्य योग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : के. सी. ई. सोसायटी संचलित, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागामार्फत अमळनेर शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल येथे सात दिवसीय विनामूल्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिराला महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सदर योग शिबिराचे उद्घाटन योगशिक्षिका सौ. पुनम शशिकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागाचे संचालक योग प्राध्यापक डॉ. देवानंद सोनार सर तसेच प्राध्यापिका सौ. ज्योती वाघ मॅडम यांची विशेष उपस्थिती होती.

दि. २७ एप्रिल २०२६ ते दि. ३ मे २०२६ दरम्यान दररोज सकाळी ६ ते ८ या वेळेत हे योग शिबिर संपन्न झाले. अमळनेर शहरातील विविध भागांतील महिला प्रशिक्षणार्थींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
योग शिक्षिका सौ. पुनम पाटील यांनी शिबिरादरम्यान विविध योगासने, प्राणायाम तसेच शुद्धी क्रिया यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच उपस्थित महिलांकडून नियमित सराव करून घेत आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले.
हे संपूर्ण योग प्रशिक्षण विनामूल्य आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या समारोपप्रसंगी सौ. पुनम पाटील यांनी योग व प्राणायामाचे मानवी जीवनातील महत्त्व, मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 155000
22 Ct सोने 91.60% : ₹. 144600
18 Ct सोने 75.00% : ₹. 121000
शुद्ध चांदी 999%:₹. 2680/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
