अमळनेर विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम; जूनपासून घराघर पडताळणी..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला असून महाराष्ट्राचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे अमळनेर विधानसभा मतदारसंघातही मतदार यादीचे विशेष पुनरिक्षण करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी दिली.
या मोहिमेंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन तपशीलांची खातरजमा करणार आहेत. प्रत्येक मतदाराची माहिती पडताळून पाहण्यासाठी घराघर सर्वेक्षण केले जाणार असून या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांकडून नियुक्त करण्यात आलेले ‘बूथ लेव्हल एजंट’ (BLA) सहकार्य करणार आहेत.

सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामाचा विचार करून या मोहिमेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया जून २०२६ पासून सुरू होऊन ऑक्टोबर २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे.
महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे वेळापत्रक
२० ते २९ जून २०२६ : बीएलओ प्रशिक्षण व पूर्वतयारी
३० जून ते २९ जुलै २०२६ : घराघर भेटी व माहिती संकलन
५ ऑगस्ट २०२६ : मसुदा मतदार यादी प्रसिद्ध
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ : दावे व हरकती नोंदणी
७ ऑक्टोबर २०२६ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
भारत निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलए नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे वगळणे तसेच नवीन पात्र मतदारांची नोंदणी अधिक अचूक आणि पारदर्शक पद्धतीने होण्यास मदत होणार असल्याचेही उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी सांगितले.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 158000
22 Ct सोने 91.60% : ₹. 147500
18 Ct सोने 75.00% : ₹. 123500
शुद्ध चांदी 999%:₹. 2800/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
