कळमसरेच्या नेहा महाजन यांना गणित विषयात पीएचडी; गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा..

0
New-Doc-05-15-2026-06.33.jpg

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : तालुक्यातील कळमसरे येथील रहिवासी तथा माजी सरपंच मनिषा महाजन आणि बांधकाम व्यावसायिक व माजी उपसरपंच मुरलीधर महाजन यांची कन्या नेहा मुरलीधर महाजन (भंगाळे) यांना मॅथेमॅटिक्स विषयामध्ये पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे कळमसरे गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


नेहा महाजन या संकेत रामकृष्ण भंगाळे यांच्या पत्नी असून जळगाव येथील नंदिनीबाई मुलींचे विद्यालयातील शिक्षिका जयश्री रामकृष्ण भंगाळे व निवृत्त लिपिक रामकृष्ण सिताराम भंगाळे यांच्या त्या सुन आहेत.
त्यांच्या संशोधन कार्यासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. नरेंद्र स्वामी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सह-मार्गदर्शक म्हणून कळमसरे येथील रहिवासी व आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, चिखलदरा येथील प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनीही विशेष मार्गदर्शन केले.


नेहा महाजन यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर हे यश संपादन केले. त्यांचे पती संकेत भंगाळे यांचाही गणित विषय असल्याने त्यांचेही संशोधन कार्यात महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
कळमसरे गावातील पीएचडी प्राप्त करणाऱ्या पहिल्या सुकन्या म्हणून नेहा महाजन (भंगाळे) यांचा गौरव होत असून त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आई-वडील, पती तसेच सासू-सासरे यांचेही सर्वत्र कौतुक केले जात आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 158000

22 Ct सोने 91.60% : ₹. 147500

18 Ct सोने 75.00% : ₹. 123500

शुद्ध चांदी 999%:₹. 2800/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed