अमळनेरमध्ये भटक्या कुत्र्यांवर ABC मोहीम; ढेकूरोड परिसरात पकडण्याची कार्यवाही सुरू.

0

अमळनेर/आबिद शेख 

 

 

अमळनेर : अमळनेर नगरपरिषद कार्यक्षेत्रातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी तसेच रेबीजचा धोका रोखण्यासाठी नगरपरिषदेकडून ABC (Animal Birth Control) कार्यक्रमांतर्गत कुत्र्यांची नसबंदी व रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत भटक्या कुत्र्यांना नियमानुसार पकडून ABC सेंटरमध्ये नेण्यात येणार असून, तेथे त्यांची नसबंदी तसेच रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे.

त्यानंतर नियमानुसार त्यांची पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
या मोहिमेचा एक भाग म्हणून गुरुवारी सायंकाळी ढेकूरोड परिसरात भटक्या कुत्र्यांना पकडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


नागरिकांनी या कार्यवाहीबाबत घाबरून न जाता नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच कुत्रे पकडण्याच्या पथकाच्या कामात अडथळा आणू नये, असे आवाहन अमळनेर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed