वडिलांच्या स्मृतीत समाजसेवेची अनोखी श्रद्धांजली; तीन भावांकडून शवपेटी भेट..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : अमलेश्वर नगर परिसरातील रहिवासी तथा सेवानिवृत्त शिक्षक कै. पंडित बाबुलाल भोई (शिंगाणे) यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रेमळ स्वभाव, साधी राहणी आणि समाजाशी घट्ट नाळ जोडलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने शिंगाणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी त्यांच्या मुलांनी वडिलांच्या संस्कारांची जपणूक करत समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबवला.

गंधमुक्ती व उत्तरकार्याच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे, नितीन शिंगाणे आणि डॉ. सुनील शिंगाणे यांनी भोई समाज बांधवांच्या सेवेसाठी शवपेटी भेट देत आपल्या वडिलांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.
मनोज शिंगाणे हे रक्तदान चळवळीच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना मदत करत असून डॉ. सुनील शिंगाणे यांनी कोरोना काळात उल्लेखनीय रुग्णसेवा दिली होती. भविष्यातही आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पांडुरंग शिंगाणे (मेंबर), भागवत महाजन (उपकार्यकारी अभियंता), रणजित शिंदे, सुभाष लंबोळे, नितू भोई, प्रवीण पाटील, नारायण भोई, सामाजिक कार्यकर्ते सुनील भोई, महावीर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संजय भोई, बापू भोई, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय भोई, संजय साटोटे सर, भाऊसाहेब शिंगाणे, रमेश भोई, पांडुरंग महाजन, कुणाल शिंगाणे, पंकज भोई, दिपक शिंगाणे, मोहन भोई, कैलास बेंद्रे, भूषण सुतार, प्रवीण भोई, हिरालाल शिवदे व हिरालाल शिंगाणे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 158000
22 Ct सोने 91.60% : ₹. 147500
18 Ct सोने 75.00% : ₹. 123500
शुद्ध चांदी 999%:₹. 2800/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
