अमळनेरात ‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’ महानाट्य दिमाखात संपन्न;                                250 कलाकारांनी जिवंत केला इतिहास,जयनिल फाऊंडेशनचा थाटात शुभारंभ.

0
New-Doc-05-14-2026-21.19.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर:- छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात काल “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” या भव्य महानाट्याचे दिमाखात सादरीकरण झाले. संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महानाट्याचे दोन्ही प्रयोग प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडले.


जयनिल फाऊंडेशनच्या वतीने सकाळी 10 वाजता महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी स्वतंत्र प्रयोग आयोजित करण्यात आला होता.यावेळी प. पु. संत प्रसाद महाराज यांच्या शुभ हस्ते जयनिल फाऊंडेशनचे लोगो अनावरण करून शुभारंभ करण्यात आला.यावेळी अध्यक्षस्थानी खासदार स्मिताताई वाघ व प्रमुख उपस्थिती माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील,लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.परीक्षित बाविस्कर,माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील,लोकनियुक्त सरपंच श्रीमती राजश्री राजेश पाटील,खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन,प्रांताधिकारी मयूर भंगाळे,पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम,जितेंद्र ठाकुर,जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील,उपाध्यक्ष वरून राजश्री पाटील, रिता बाविस्कर,उपस्थित होते.यावेळी प्रसाद महाराजांनी आशिर्वचन दिले तर आमदार अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांनी शुभेच्छा दिल्या.


जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी सांगितले की, “छत्रपती संभाजी राजे हे तरुणाईचे आदर्श आहेत, म्हणून खास युवकांसाठी हा प्रयोग ठेवला.आणि याच दिवशी जयनिल फाऊंडेशनचाही शुभारंभ केला असल्याचे सांगत भविष्यात राबविणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.शिक्षण, आरोग्य, शेती, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात काम करून तरुणाईला केंद्रबिंदू मानून फाऊंडेशन काम करेल असे त्यांनी सांगितले.
तर संस्कृती फाऊंडेशनचे निकेश राजपुत यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी बळ दिल्याबद्दल आमदार अनिल पाटील आणि जयनिल फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.

250 कलाकारांनी जिवंत केला इतिहास या महानाट्यात सुमारे 250 कलाकारांनी भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे यातील 80 टक्क्यांपेक्षा अधिक कलाकार अमळनेरचे होते. "ज्या कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही, त्यांना संधी देण्याचा प्रयत्न संस्कृती फाऊंडेशनने केला,"सर्वानी उत्कृष्ठ भूमिका साकारल्या, कथानकही सुंदर होते,अनेक क्षण अंगावर शहारे आणत होते.या महानाट्यामुळे लाईव्ह इतिहास प्रेक्षकांसमोर उभा राहिला,छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या घोषणांनी सभागृह दणाणले होते.संभाजी महाराजांच्या अखेरच्या क्षणाने साऱ्यांचे डोळे पाणावले होते.शेवटी संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या कलावंतांसमोर अनेक जण नतमस्तक होऊन संस्कृती फाऊंडेशन आणि जयनिल फाऊंडेशचे आभार मानत मार्गस्थ झाले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 158000

22 Ct सोने 91.60% : ₹. 147500

18 Ct सोने 75.00% : ₹. 123500

शुद्ध चांदी 999%:₹. 2800/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed