अमळनेरात उष्णतेचा कहर कायम; बसस्थानकात कोसळलेल्या व्यक्तीचा मृत्यू..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : तालुक्यात प्रचंड उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून उष्माघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच अमळनेर शहरात आणखी एक दुर्दैवी घटना घडली असून बसस्थानक परिसरात अचानक कोसळलेल्या व्यक्तीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीहरी प्रभाकर दीक्षित हे धार्मिक विधी कार्यक्रम आटोपून आपल्या घरी जाण्यासाठी अमळनेर बसस्थानकात आले होते. दुपारच्या तीव्र उन्हामुळे व वाढलेल्या तापमानामुळे त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जागीच कोसळले.

घटनेची माहिती मिळताच कर्तव्यावर असलेले ट्रॅफिक पोलीस कर्मचारी संजय बोरसे, विनय पाटील आणि रवींद्र बोरसे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी तत्परता दाखवत त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 159500
22 Ct सोने 91.60% : ₹. 147500
18 Ct सोने 75.00% : ₹. 122800
शुद्ध चांदी 999%:₹. 2860/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

