अमळनेरात आज “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” महानाट्याचे आयोजनसंस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दोन प्रयोग..

0
New-Doc-05-14-2026-06.42.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज, १४ मे रोजी अमळनेर शहरात “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने तसेच जयनिल फाऊंडेशनच्या अनमोल सहकार्याने हे महानाट्य छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सादर होणार आहे.


सामाजिक जाणीव व विविध क्षेत्रातील उणिवा दूर करण्याच्या उद्देशाने अमळनेरात जयनिल फाऊंडेशनचा शुभारंभ होत असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीदिनीच संस्थेच्या कार्याचा प्रारंभ होत असल्याची माहिती युवा उद्योजक तथा आमदार अनिल पाटील यांचे सुपुत्र गौतम पाटील व वरुण राजेश पाटील यांनी दिली.
संस्कृती फाऊंडेशनचे नाट्यकलाकार निकेश राजपूत यांनी सांगितले की, या महानाट्यात सुमारे २५० कलाकार सहभागी असून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि बलिदानाची गाथा यातून सजीव स्वरूपात मांडली जाणार आहे. सात्विक ठकार लिखित आणि राकेश राजपूत दिग्दर्शित या महानाट्यात उत्तर महाराष्ट्रातील कलाकारांचा सहभाग असून त्यातील ८० टक्क्यांहून अधिक कलाकार अमळनेर येथील आहेत.


ज्या कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही किंवा परिस्थितीमुळे संधी मिळू शकली नाही, अशा कलाकारांना संधी देण्याचा प्रयत्न संस्कृती फाऊंडेशनने केला असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी नंदुरबार व धुळे येथे या महानाट्याचे तीन यशस्वी प्रयोग झाले असून अमळनेरात चौथा व पाचवा प्रयोग सादर केला जाणार आहे.
महानाट्यासाठी गेल्या महिनाभरापासून स्थानिक कलाकारांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. चित्रपट हा कृत्रिम माध्यम असला तरी महानाट्याच्या माध्यमातून इतिहास थेट प्रेक्षकांसमोर जिवंत स्वरूपात उभा राहणार असल्याचे निकेश राजपूत यांनी नमूद केले. आमदार अनिल पाटील तसेच जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील व वरुण राजेश पाटील यांच्या सहकार्यामुळे हे महानाट्य अधिक व्यापक स्वरूपात तरुणाईपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले.
या महानाट्याचे दोन प्रयोग होणार असून सकाळी १० वाजता पहिला तर सायंकाळी ६ वाजता दुसरा प्रयोग सादर केला जाणार आहे.
तरुणाईसाठी सकाळी विशेष प्रयोग
जयनिल फाऊंडेशनचे गौतम पाटील यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज हे तरुणाईचे प्रेरणास्थान असल्याने महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी आज सकाळी १० वाजता विशेष स्वतंत्र प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. सर्व युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 159500

22 Ct सोने 91.60% : ₹. 147500

18 Ct सोने 75.00% : ₹. 122800

शुद्ध चांदी 999%:₹. 2860/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed