अमळनेर तालुक्यात उष्माघाताचा धोका वाढला; ४५ अंश तापमानात ३ जण बाधित..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : तालुक्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट सुरू असून तापमानाने तब्बल ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. प्रखर उन्हामुळे नागरिकांचे हाल होत असून उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र आहे. आज दिवसभरात उष्माघातामुळे तीन जणांना त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे.

दुपारी १ ते ४ या धोकादायक वेळेतही शहरातील बाजारपेठ आणि प्रमुख रस्त्यांवर मोठी गर्दी दिसून आली. विशेषतः वृद्ध नागरिक मोठ्या प्रमाणात उन्हात बाहेर पडत असल्याने आरोग्याचा धोका अधिक वाढत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीला कडक उन्हातून घरी आल्यानंतर अचानक त्रास जाणवू लागला. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिल्याने त्यांना झटका आल्याचे सांगितले जात आहे. संबंधित घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शासनाने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित कुटुंबाला मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित व्यक्तीच्या पश्चात लहान मुले असल्याने नागरिकांकडून सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

दरम्यान, पावसाळा जवळ आल्याने शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकरी कडक उन्हातही शेतात काम करत आहेत. शेतीच्या गरजेमुळे अनेकांना उन्हात काम करणे टाळता येत नसल्याने उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर टोपी किंवा कपडा वापरावा तसेच वृद्ध आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 152000
22 Ct सोने 91.60% : ₹. 140600
18 Ct सोने 75.00% : ₹. 117000
शुद्ध चांदी 999%:₹. 2660/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
