१५ मेपूर्वी स्व जनगणना करा; १६ मेपासून घरोघरी जनगणना सुरूप्रांत मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांचे आवाहन.

0
New-Doc-05-13-2026-06.33.jpg

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : राष्ट्रीय जनगणना १५ मेपासून सुरू होत असून या महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यात प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच १५ मेपूर्वी स्व जनगणना करून घ्यावी, असे संयुक्त आवाहन उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.


स्व जनगणनेत नागरिकांची प्राथमिक माहिती नोंदवून त्यांचा स्वतंत्र आयडी तयार केला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष जनगणना करताना प्रगणकांना काम करणे अधिक सोपे होणार असून माहितीतील चुका टाळल्या जातील. नागरिकांनी स्वतः माहिती भरल्याने तिची सत्यता अधिक राहणार असून वेळेचीही बचत होणार आहे.

Q
नागरिकांनी आपल्या मोबाईलवरून स्व जनगणना संकेतस्थळ⁠� ही लिंक उघडून ओटीपीद्वारे लॉगिन करावे. त्यानंतर क्रमाक्रमाने आवश्यक माहिती भरता येणार आहे. माहिती पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना मेल तसेच मोबाईल मेसेजद्वारे जनगणना आयडी प्राप्त होईल. हा आयडी प्रगणक घरी आल्यानंतर दाखवावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
स्व जनगणनेसाठी अवघे दोन दिवस बाकी असल्याने नागरिकांनी तत्परतेने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, अमळनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभापती अशोक पाटील, सचिव डॉ. उन्मेष राठोड आणि डी. ए. धनगर यांच्या सहकार्याने कर्मचाऱ्यांना स्व जनगणनेची माहिती देण्यात आली व प्रत्यक्ष जनगणना प्रक्रिया करण्यात आली.
१६ मेपासून घरोघरी प्रगणक
१६ मेपासून प्रत्यक्ष घरोघरी जनगणना सुरू होणार असून नागरिकांना एकूण ३४ प्रश्न विचारले जाणार आहेत. ग्रामीण भागात तहसील प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ३३७ प्रगणक काम करणार असून त्यांच्यावर ५० सुपरवायझर नियंत्रण ठेवतील.
तर शहरी भागात नगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली १९४ प्रगणक नियुक्त करण्यात आले असून ते प्रत्येक प्रभागातील गल्ल्यांमध्ये जाऊन जनगणना करतील. या कामावर ३२ सुपरवायझर देखरेख ठेवणार आहेत.
नागरिकांनी प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रांत अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी गणेश शिंदे आणि उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152000

22 Ct सोने 91.60% : ₹. 140600

18 Ct सोने 75.00% : ₹. 117000

शुद्ध चांदी 999%:₹. 2660/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed