रीता बाविस्कर यांच्या पुरवणी जबाबाने धुळे हल्ला प्रकरणाला नवे वळण..

0
New-Doc-05-12-2026-23.41.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : समाजसेविका तथा महाराष्ट्र शासन ग्रंथालय राज्य नियोजन समिती सदस्य सौ. रिता भुपेंद्र बाविस्कर यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीबाबत पुरवणी जबाब नोंदवून महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. प्रारंभीच्या तक्रारीत दोन जणांची नावे चुकून नमूद झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.


सौ. बाविस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.१५ वाजेच्या सुमारास त्या आपल्या नातेवाईक व चालकासह बोलेरो वाहनाने वणी (ता. जि. धुळे) परिसरातून जात असताना एका चारचाकी वाहन व मोटारसायकलवरील काही अनोळखी इसमांनी त्यांचा पाठलाग केला. अचानक वाहनासमोर येत गाडीच्या पुढील व मागील टायरजवळ लाकडी खिळ्यांचा रॉड टाकून वाहन पंक्चर करण्यात आले तसेच गाडीवर हल्ला करून नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


या प्रकरणी सुरुवातीला प्रणील गंगाधर मंडलीक (रा. मंगलनगर, साक्री रोड, धुळे), निलेश रघुनाथ पाटील (रा. जुनवणे, ता. जि. धुळे), प्रमोद देविदास सोनवणे (रा. बाळापूर, ता. जि. धुळे) व इतर अनोळखी इसमांविरोधात तक्रार देण्यात आली होती.
मात्र, पुरवणी जबाबात सौ. बाविस्कर यांनी स्पष्ट केले की, प्रणील मंडलीक व निलेश पाटील हे प्रत्यक्षात मदतीसाठी आले होते आणि त्यांची नावे नकळत फिर्यादीत नमूद झाली. तर वाहनावर हल्ला करून नुकसान करणारे मिलींद पाटील (रा. वरखेडी), सौरभ जाधव (रा. दंडेवाला बाबा नगर, मोहाडी उपनगर, धुळे) व प्रमोद देविदास सोनवणे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152000

22 Ct सोने 91.60% : ₹. 140600

18 Ct सोने 75.00% : ₹. 117000

शुद्ध चांदी 999%:₹. 2660/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed