शिक्षण व समाजसेवेत उल्लेखनीय कार्य; डॉ. अर्चना सूर्यवंशी यांना ‘इंडियाज प्राईड अवॉर्ड 2026’

0
New-Doc-05-11-2026-09.30.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. अर्चना सूर्यवंशी यांना ‘इंडियाज प्राईड अवॉर्ड 2026’ या राष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात आले. जळगाव येथील हॉटेल प्रेसिडेंट कॉटेजमध्ये ८ मे रोजी आयोजित ‘सुपर मॉम सुपर वूमन 2026 – सीझन 4’ या कार्यक्रमात आरव्ही एंटरटेनमेंट्सतर्फे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री Mahima Chaudhry तसेच Raju Mama Bhole यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते डॉ. अर्चना सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला.


डॉ. सूर्यवंशी या Noble International School तसेच Podar International School यांच्या संचालिका असून, सामान्य परिस्थितीतून पुढे येत त्यांनी ग्रामीण भागात आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची भक्कम पायाभरणी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच संस्कारांचेही धडे मिळत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही त्यांच्याकडून असेच प्रेरणादायी कार्य घडावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 151300

22 Ct सोने 91.60% : ₹. 140000

18 Ct सोने 75.00% : ₹. 116500

शुद्ध चांदी 999%:₹. 2580/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed