रॉयल उर्दू स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरावर घवघवीत यशUPSC प्रिपरेटरी मिशन परीक्षेत अमळनेरच्या विद्यार्थ्यांनी चमकवला झेंडा..

0
New-Doc-05-10-2026-14.18.jpg


अमळनेर /आबिद शेख
अमळनेर येथील रॉयल उर्दू प्रायमरी स्कूल, हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र उर्दू स्कूल कॉम्पिटिटीव्ह प्रिपरेटरी मिशन UPSC राज्यस्तरीय परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत अमळनेर शहराच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.


अलफैज फाऊंडेशन, जळगाव तथा डॉ. अब्दुल करीम सालार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा, तालुका आणि शाळास्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात हेच विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार, सर्कल ऑफिसर बनून अमळनेरचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
राज्यस्तरीय यश


Shaikh Barrira Firdous Mohammad Iqbal — इयत्ता 11 वी, महाराष्ट्र राज्यस्तरावर प्रथम क्रमांक
जिल्हास्तरीय यश
Rida Raunaque Ali Sayyed — इयत्ता 9 वी, जळगाव जिल्ह्यात तृतीय क्रमांक
तालुकास्तरीय यश
Azim Shaikh Nazim — इयत्ता 11 वी, प्रथम क्रमांक
Tahirin Bi Saeed Bagwan — इयत्ता 9 वी, प्रथम क्रमांक
Sabrina Asim Najir — इयत्ता 7 वी, प्रथम क्रमांक
Khushi Shaikh Anis — इयत्ता 11 वी, द्वितीय क्रमांक
Taiyaba Fatema Sadik Khan — इयत्ता 9 वी, द्वितीय क्रमांक
Ifat Shaikh Aabid — इयत्ता 7 वी, द्वितीय क्रमांक
Rida Fatema Shaikh Jakiroddin — इयत्ता 11 वी, तृतीय क्रमांक
Umme Aeman Nasir Khan — इयत्ता 9 वी, तृतीय क्रमांक
Mariyam Galib Shaikh — इयत्ता 11 वी, तृतीय क्रमांक
शाळास्तरीय यश
Aliza Naaz Iqbal Ahmed Bagwan — इयत्ता 11 वी, प्रथम क्रमांक
Mahenur Mohammad Amin Pasha — इयत्ता 9 वी, प्रथम क्रमांक

Akmal Shaikh Kamil 1st School Level 7th Classविद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमींनी अभिनंदन केले आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि प्रशासकीय सेवेकडे आकर्षण निर्माण होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 151300

22 Ct सोने 91.60% : ₹. 140000

18 Ct सोने 75.00% : ₹. 116500

शुद्ध चांदी 999%:₹. 2580/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed