अमळनेर बस स्थानकातील ग्रामीण बस फेऱ्यांच्या ठिकाणात बदल ; पाच पावली देवी मंदिराजवळून सुटणार बसेस.
अमळनेर/ आबिद शेख 
अमळनेर – अमळनेर बस स्थानक येथे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने स्थानकातील उपलब्ध जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
फक्त अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या व येणाऱ्या बस फेऱ्या* आता बस स्थानकातून न सुटता, *पाच पावली देवी मंदिराजवळ, नवीन प्रशासकीय इमारतीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानावरून* सुटतील.

हा बदल तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आला असून, काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत हा बदल लागू राहणार आहे.
तरी सर्व प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी व बस प्रवासासाठी सदर नवीन ठिकाणी वेळेवर उपस्थित राहून एसटी महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन आगार व्यवस्थापकांनी केले आहे.
आगार व्यवस्थापक – श्री. राकेश शिवरे (8208014691)
श्री. प्रमोद बाविस्कर (9511761158)
वाहतूक निरीक्षक – श्री. मुकेश संदाणे (9270839990)

