पारोळा पश्चिम सोसायटीच्या कर्ज समिती अध्यक्षपदी नाना सोळुंखे यांची निवड.
अमळनेर /आबिद शेख 
अमळनेर -पारोळा येथील जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी (पश्चिम सोसायटी) च्या विविध समित्यांच्या अध्यक्ष व संचालकपदी निवड नुकतीच जाहीर करण्यात आली.
शिक्षक नेते प्रगती गटाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, शिक्षक नेते आर.जे. पाटील व राजेंद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. शनिवारी दुपारी 2 वाजता मुख्य कार्यालय पारोळा येथे पतपेढीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.

निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे –
– कर्ज समिती अध्यक्षपदी -नाना सोळुंखे
– कर्मचारी नियंत्रण समिती अध्यक्षपदी -अशोक इसे
– तज्ञ संचालकपदी – विश्वनाथ गोरक्षनाथ पाटील (चोपडा) व भटू काशिनाथ पाटील (मंगरूळ, ता. अमळनेर)
यावेळी सचिन वाघ, संभाजी पाटील, संदीप पाटील, रवींद्र पाटील, भरत जाधव, यशवंत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पतपेढीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, शिक्षक संघटना व जिल्हा परिषद शाळांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

