आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर एलसीबीची धडक कारवाई; १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त..

0
New-Doc-05-10-2026-12.40.jpg

24 प्राईम न्यूज 10 May 2026
जामनेर : जामनेर पोलीस स्टेशन हद्दीत आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत तब्बल १० लाख ५३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हिवरखेडा रोड परिसरातील एका घरामध्ये काही इसम आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.


या कारवाईदरम्यान पोलिसांनी ९ लाख २ हजार ३०० रुपये रोख रक्कम, १ लाख ३० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन, २५ हजार रुपये किमतीचा टीव्ही व साउंड बार, तसेच ४१ एटीएम कार्ड आणि इतर साहित्य असा एकूण १० लाख ५३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी देवानंद सुभाष सोनवणे, रितेश अशोक नेरकर, परीक्षित रवींद्र पाटील आणि प्रवीण जगन्नाथ टहाकडे (सर्व रा. जामनेर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कारवाईनंतर जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २३६/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४ व ५ प्रमाणे चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 151300

22 Ct सोने 91.60% : ₹. 140000

18 Ct सोने 75.00% : ₹. 116500

शुद्ध चांदी 999%:₹. 2580/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed