अमळनेरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरीआमदार अनिल पाटील यांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण..

0
20260510_104923-BlendCollage.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : अमळनेर तालुका राजपूत एकता मंचतर्फे हिंदू सूर्यकुल वीर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह यांची जयंती शुक्रवारी (दि. ९ मे) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील महाराणा प्रताप चौक येथे असलेल्या महाराणा प्रताप स्मारकस्थळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्य, स्वाभिमान व राष्ट्रभक्तीला अभिवादन करत एकजुटीचा संदेश दिला. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.


कार्यक्रमादरम्यान अमळनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चेतन राजपूत यांचा राजपूत एकता मंचतर्फे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संजय पुनाजी पाटील, जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील, नगरसेवक सचिन पाटील, जितेंद्र ठाकूर, कामगार नेते एल. टी. पाटील यांच्यासह राजपूत एकता मंचचे अध्यक्ष रणजित पाटील, नरेंद्रसिंग ठाकूर, अंबरसिंग पाटील, अनिल पाटील, प्रकाश पाटील, ॲड. दीपेन परमार, विजयसिंग पवार, गोकुळ पाटील, अजयसिंग पाटील, दीपेन राजपूत, ओंकार राजपूत, भरतसिंग पाटील, जितेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, बापू पाटील, सुनील पाटील, जयदीप राजपूत, नचिकेत महाले, केदारसिंग राजपूत, दिनेश पाटील, ज्ञानेश्वर राजपूत, विलास राजपूत, मुकेश राजपूत, मनोज पाटील, सूरज परदेशी यांच्यासह राजपूत समाजबांधव आणि महाराणा प्रताप प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed