जनगणना 2027 साठी स्वगणनेचे आवाहन; 15 मेपर्यंत वेबसाईट सुरू..

24 प्राईम न्यूज 10 May 2026
जनगणना 2027 अंतर्गत आगामी घरयादी व घरगणना प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल माध्यमातून पार पडणार असून, नागरिकांनी स्वगणना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील जनगणना शाखेकडून करण्यात आले आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी वैशाली चव्हाण यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना पत्र जारी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सर्वसामान्य नागरिकांसाठी se.census.gov.in ही वेबसाईट 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत सुरू ठेवण्यात आली आहे. या वेबसाईटवर नागरिकांना स्वगणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून, जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, चार्ज अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, शिक्षण विभाग, सांख्यिकी विभाग तसेच इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच प्रत्येक गावात ग्रामसेवकांच्या माध्यमातून दवंडी देऊन स्वगणनेबाबत माहिती पोहोचविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांना स्वगणना करताना अडचणी आल्यास ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांनी आवश्यक मदत करावी, असेही निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
दरम्यान, स्वगणनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाकडून स्प्रेडशीट तयार करण्यात आले असून संबंधित विभागांनी त्यामधील माहिती भरून 11 मे 2026 पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 151300
22 Ct सोने 91.60% : ₹. 140000
18 Ct सोने 75.00% : ₹. 116500
शुद्ध चांदी 999%:₹. 2580/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
