पुणे शहरातून सुनेचा खून करून फरार झालेला आरोपी जळगाव एलसीबीच्या जाळ्यात..

24 प्राईम न्यूज 9 May 2026
जळगाव : पुणे शहरातील नांदेड सिटी परिसरात सुनेचा खून करून फरार झालेल्या आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे जळगाव एलसीबीच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ मे २०२६ रोजी पुणे येथील रायकर मळा परिसरात राहणारे आरोपी भानुदास भास्कर चौधरी यांनी घरगुती कारणावरून आपल्या सून स्वाती तेजस चौधरी हिच्या डोक्यात वार करून निर्घृण खून केला होता. खून केल्यानंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून पलायन केले होते.

घरामध्ये लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी ही माहिती स्वाती हिचे पती तेजस भानुदास चौधरी यांना दिली. त्यांनी घरी येऊन पाहिले असता पत्नी स्वाती या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्या. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १०५/२०२६ अन्वये BNS कलम १०३(१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार होता. दरम्यान, दिनांक ९ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, जळगावचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी भानुदास चौधरी हा जळगाव शहरातील मेहरूण गाव परिसरातील महादेव मंदिर भागात लपून राहत आहे.
माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले. पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपासासाठी आरोपीला नांदेड सिटी पोलीस स्टेशन, पुणे शहरच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अतुल वंजारी, विजय पाटील, अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, राहुल रगडे, रविंद्र कापडणे व प्रदीप चौरे यांनी सहभाग घेत कौशल्यपूर्ण कामगिरी बजावली.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 151300
22 Ct सोने 91.60% : ₹. 140000
18 Ct सोने 75.00% : ₹. 116500
शुद्ध चांदी 999%:₹. 2580/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
