मांडळच्या सुनेची सुरत महानगरपालिकेत नगरसेवकपदी विजयी भरारी..

0
New-Doc-05-08-2026-22.39.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : तालुक्यातील मांडळ गावच्या सून तथा भाजपच्या उमेदवार सुषमा युवराज पाटील यांनी सुरत महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक २५ मधून भव्य मताधिक्याने विजय मिळवत नगरसेवकपदी दमदार भरारी घेतली आहे. त्यांच्या विजयामुळे मांडळ गावासह अमळनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


सुषमा पाटील यांना केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील तसेच लिंबायत विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संगीता ताई पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्या २०१२ पासून भाजपमध्ये सक्रियपणे कार्यरत असून विविध सामाजिक व विकासकामांमधून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.


त्यांचे सासरे विक्रम पाटील हे १९९० पासून भाजपचे जुने व निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांनी २०२१ मध्ये सुरत येथे नगरसेवक म्हणूनही काम पाहिले होते. तसेच सुषमा पाटील यांची २०१५ मध्ये नगर प्राथमिक शिक्षण समिती, सुरत येथे भवन समितीच्या सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली होती.
गेल्या काही वर्षांतील सातत्यपूर्ण सामाजिक कार्य आणि जनसंपर्काच्या जोरावर भाजपने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत २०२६ च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक २५ मधून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन करत आपल्या कार्याची पोचपावती मिळवली.
त्यांच्या या उल्लेखनीय विजयाबद्दल अमळनेर तालुका, मांडळ गावातील नातेवाईक, मित्रपरिवार तसेच भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 151500

22 Ct सोने 91.60% : ₹. 140100

18 Ct सोने 75.00% : ₹. 116600

शुद्ध चांदी 999%:₹. 2580/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed