पोदार लर्न स्कूलला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसादआधुनिक शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रियेला वेग..


आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरातील गलवाडे रोडवरील नव्याने सुरू झालेल्या पोदार लर्न स्कूल या इंग्लिश मीडियम शाळेला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते नुकताच शाळेचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटनानंतर अनेक पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पोदार लर्न स्कूलची निवड करत प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे.
आधुनिक व दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून शाळेकडे पाहिले जात असून, भव्य इमारत, सुरक्षित वातावरण, प्रशिक्षित शिक्षकवर्ग तसेच तंत्रज्ञानाधारित शिक्षण पद्धतीमुळे पालकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
यावेळी बोलताना शाळेच्या चेअरमन डॉ. अर्चना प्रशांत सूर्यवंशी यांनी सांगितले की, उद्घाटनानंतर मिळालेला पालकांचा प्रतिसाद अत्यंत समाधानकारक असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आधुनिक शिक्षणासोबत संस्कारक्षम वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
शाळेचे संचालक प्रशांत सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत सुरक्षित आणि आनंददायी वातावरण उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला.
शाळेच्या परिसरात स्वच्छ, हवेशीर व सुसज्ज वर्गखोल्या तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, आकर्षक वर्गरचना तसेच वाहन व बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, ९८ वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पोदार समूहाच्या भारतभर २७३ पेक्षा अधिक पार्टनर स्कूल्स कार्यरत आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील विश्वासार्ह नाव म्हणून पोदार समूहाकडे पाहिले जाते.
सध्या प्ले ग्रुप ते इयत्ता चौथीपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू असून आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणासोबत भारतीय संस्कृती जपणारे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमही शाळेत राबविण्यात येणार आहेत.
प्रवेशासाठी संपर्क :
पोदार कॅम्पस, स्वादिष्ट नमकीन जवळ, गलवाडे रोड, अमळनेर
मो. : ९१७५६७५६५१ / ८६६८४१२७२३
कार्यालयीन वेळ : सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 151500
22 Ct सोने 91.60% : ₹. 140100
18 Ct सोने 75.00% : ₹. 116600
शुद्ध चांदी 999%:₹. 2580/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
