वेतनवाढ फरकाचा निधी अद्याप रखडला; एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी..

0
New-Doc-05-08-2026-09.44.jpg

24 प्राईम न्यूज 8 May 2026
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरकाची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी केली होती.

मात्र डिसेंबरपासून तब्बल पाच महिने उलटून गेल्यानंतरही अर्थ खात्याकडून एसटी महामंडळाला आवश्यक निधी मिळालेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याबाबत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारवर टीका केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पूर्ण वेतनासाठी दर महिन्याला सरासरी ४७४ कोटी ८४ लाख रुपयांची आवश्यकता असते. त्यात वेतनवाढ फरकाच्या हप्त्याची ५८ कोटी ३० लाख रुपयांची भर पडत असून एकूण मासिक खर्च सुमारे ५३४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो. मात्र सरकारकडून यंदाच्या महिन्यात केवळ ४१६ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.


यामुळे वेतनवाढ फरकाची रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाला स्वतःच्या तिजोरीवर ताण सहन करावा लागत आहे. डिसेंबर २०२५ पासून सुमारे २९१ कोटी ५० लाख रुपयांचा थकीत निधी सरकारकडे प्रलंबित असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, मागणीनुसार निधी न मिळाल्याने एसटी महामंडळाची वैधानिक देणीही ५ हजार कोटी रुपयांवर गेली आहेत. यामध्ये भविष्य निर्वाह निधी (पीएफ), ग्रॅच्युईटी, एसटी बँक तसेच विविध पुरवठादारांची देणी थकीत राहिली आहेत. अनेक संस्था व्याजावर चालत असून गेल्या काही महिन्यांपासून गुंतवणुकीवरील परतावा न मिळाल्याने आर्थिक अडचणी वाढत आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास संबंधित संस्थांवर आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152000

22 Ct सोने 91.60% : ₹. 140600

18 Ct सोने 75.00% : ₹. 117000

शुद्ध चांदी 999%:₹. 2580/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed